आपली जातीय वा धार्मिक सत्ता टिकून राहावी, म्हणून इतरांवर अत्याचार करणे, हे कुठल्याच ‘सुसंस्कृत राजकीय समाजा’चे लक्षण असू शकत नाही!
एखाद्या राज्यामध्ये; तेही ईशान्य भागासारख्या ठिकाणी इतकी टोकाची हिंसा घडते आणि अनेक महिने उलटून गेल्यावर इतर भागांमधील संवेदनशील नागरी समाज, दलित आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना, पुरोगामी गट यांच्या दबावामुळे आणि न्यायव्यवस्थेने केलेल्या हस्तक्षेपामुळे सत्तारूढ पक्षातील सर्वोच्च नेत्याच्या तोंडून काही तोंडदेखली वाक्ये बाहेर पडतात, हे सकस लोकशाहीचे लक्षण नाही.......